उर्जा क्रांती
आज आपण अशा जगात जगतो आहोत जेथे आपल्याला किंवा यंत्रांना जगण्यासाठी एका महत्त्वाच्या गोष्टीची गरज असते. त्याला आपण असेही म्हणू शकतो कि त्याशिवाय आपण जगू शकत नाही, ती म्हणजे ऊर्जा. ऊर्जेला आपण शक्ती पण म्हणतो. आपल्याला माहितीच असेल ऊर्जा ही किती प्रकारची आहे, परंतु बहुतेकांना माहितीही नसेल कि ती किती स्वच्छ आहे कि नाही.
ऊर्जा ही विविध माध्यमातून निर्मित करता येते. पारंपारिक रित्या आपण कोळस्यापासून ऊर्जा निर्मिती करतो. ऊन, वारा, पाणी यापासून सुद्धा ऊर्जा निर्मिती करता येते. सूर्याच्या किरणांपासून बनणारी ऊर्जा हि सौरऊर्जा, हवेपासून बनणारी पवन ऊर्जा. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण अनुचा अभ्यास करून अणुउर्जा तयार केली, याच्याही पुढे जाऊन nuclear energy कडे वाटचाल करीत आहोत.
जी ऊर्जा आपल्या घरापर्यंत पोहोचते ती ऊर्जा मुख्य रुपात कोळस्यापासून बनते. कोळसा हि नैसर्गिक संपत्ती असून मर्यादित स्वरुपात उपलब्ध आहे. कोळस्यापासून बनणाऱ्या उर्जेला वाहून नेऊन वापरावी लागते. कोळसा हा मर्यादित असून त्यापासून बनणारी ऊर्जा हि सुद्धा मर्यादित आहे. त्यापासून बनणारी ऊर्जा ही आत्ताच्या काळात आर्थिकरित्या परवडणारी नाही आणि मर्यादितपणामुळे त्याला वारंवार वापरून बनणारी ऊर्जा हि दूषित होते.स्वच्छ प्रमाणात बनत नाही.
उर्जेची गरज भागवण्याकरता वेगवेगळे उपाय उपलब्ध आहे. परंतु स्वच्छ ऊर्जा मिळवण्याचे कमी. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण त्याही परिस्थितीचा सामना करू. एवढी ताकद हि विज्ञानात व त्याच्या वापरात आहे. आपला कल हा स्वच्छ ऊर्जा निर्मिती व वाटप याकडे असायला हवे. परंतु हे कसेकाय शक्य आहे?
जसजशी प्रगती होत आहे त्याचप्रमाणे आपल्याला ऊर्जानिर्मिती मध्ये गरज व प्राथमिकता लक्षात घेऊन बदल केले पाहिजे. पारंपारिक ऊर्जा निर्मिती पद्धतीला बगल देऊन विज्ञानाच्या सहाय्याने आपण सूर्यापासून येणाऱ्या किरणांना उर्जेच्या दुसर्या रुपात परीवर्तीत करून वापरता येऊ शकते. परंतु याकरिता जागेची उपलब्धता व १ वेळ गुंतवणूक जास्त असते. हे फायदेशीर असून पर्यावरण पूरक आहे. यामुळे पर्यावरणात होणार्या प्रदूषणाच्या पातळीत काही अंशी का होईना घट करता येईल.
वरती सांगितल्याप्रमाणे सौरऊर्जा, पवनउर्जा या व यासारख्या अनेक उपायांचा वापर करू शकतो. या सर्वामध्ये आपण मुख्यत्वे उर्जेच्या एका रुपाला दुसर्या रुपात परिवर्तीत करून आपल्या दैनदिन वापरात उपयोगी आणू शकतो. याच एक चांगल उदाहरण देतो म्हटलं तर ते होईल सौरपंप. पारंपारिक पद्धतीच्या वीजपंपाला येणाऱ्या विजेच्या बदल्यात तेथे सौरउर्जा संयंत्र बसवले व पंपाला वीज देण्याचे काम केले. यामध्ये वीज वाहून नेण्याचे काम वाचले.
स्वच्छ ऊर्जा निर्माण करायला जास्त वेळ,पैसा लागू नये जो कि पारंपारिक पद्धतीत लागतो तरच ते सामान्य जनतेच्या उपयोगी पडेल. अमेरिकेतली लोक उर्जेवर जवळपास ४३१ billion $ कमी खर्च करतात. त्याच कारण असे कि तेथे त्यांनी स्वच्छ ऊर्जा निर्मिती वर भर दिला. त्यातून तेथे नैसार्गिक वायू, तेल, वीज यांसारख्यांच्या किमतीत खूप मोठी घट झालेली आहे.
या ज्वलंत प्रश्नाकडे आपण सर्वांनी संयुक्त व वैयक्तिक रित्या ज्याप्रकारे लक्ष देता येईल तेवढे लक्ष देण्याचा प्रयत्न करवा व स्वच्छ ऊर्जा क्रांतीचा भाग व्हावा.
Comments
Post a Comment