माई

       आज आपल्या सर्वांच्या जीवनातील एका महत्त्वपूर्ण विषयावर बोलूयात. जिच्या मुळे आपण जन्माला आलो, जिच्यामुळे आपलं अस्तित्व टिकून आहे अशी आपल्या  सर्वांच्या जीवनातील अति महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणजे आपली आई . ती कोनाची  आई असते तर  कोनाची माई. कोणी तिला Mummy किंवा Mom अशी हाक मारतात. ती जर नसती तर आपल्या असण्याला , अस्तित्वाला अर्थच राहिला नसता.आई ही जननी आहे. आपल्या जन्माची सुरुवात ही आईच्या उदरातून(गर्भपिशवी) होते. जेव्हा आपण या जगात यायचो होतो, आपलं अस्तित्व निर्माण व्हायचं होत तेव्हा पासून ती आपल्यावर प्रेम करते. जसजस आपण तिच्या गर्भामध्ये मोठं होत जातो तसतसं आपलं आणि आपल्या आईच एक वेगळंच अलिखित नातं तयार होत जातं. आणि काळानुरूप ते वृद्धिंगत होत राहत.
             आपल्या मोठं होण्या सोबतच तिच्या वेदनाही मोठ्या होत असतात. या काळात तिला गरज असते आधाराची , एकप्रकारच्या मानसिक समाधानाची. जर मानसिक स्वास्थ्यासोबतच आहार चांगला असला तर होणार अपत्य हे मानसिक व शारीरिक रित्या सुदृढ जन्मास येत. आहारामध्ये एखादवेळी कमी जास्त पणा चालतो. पण जर मानसिक स्वास्थ्य कमकुवत असलं तर होणाऱ्या अपत्यावर त्याचे दुष्परिणाम होण्याचे प्रमाण अधिक वाढते. आपल्याला जन्म दिला म्हणजे आईच कर्तव्य संपलं अस नाही. उलट जन्म झाल्यावर आईची जबाबदारी आणखी वाढते. आपल्या रडण्याचा आवाजावरून ती समजून जाते आपल्याला काय हवं-नको ते. आपल्या सोबतच तिला परिवारातल्या बाकीच्या सदस्यांची सुद्धा काळजी घ्यावी लागते. जेव्हा वातावरण बदलते तेव्हा आपली तब्येत खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास बाकी सदस्यापेक्षा आपली आई आपल्यावर जास्त लक्ष देते. रात्र-रात्र आपल्या साठी जागी राहते. 
              आपल्याला समाजाने चांगलं म्हणावे म्हणून ती आपल्यावर गर्भात असल्या पासून संस्कार करत असते. ती आपल्याला नाते समजावून सांगते, संध्याकाळच्या वेळी मनाचे श्लोक , शुभंकरोती, इत्यादी शिकवते व करायला लावते. यातून आपल्या समाज जीवनावर परिणाम होतो व आपली भाषा तसेच मनाची शुद्धता होत राहते. हे सगळं करण्यामागचा तिचा प्रामाणिक हेतू असा की आपलं मूल हे जगामध्ये आपल्या कर्तृत्वाने ताठ मानेने जगावं हाच असतो.
           हे सर्व करत असताना कधी ती दमते, घाबरते,थकते. अश्या वेळी तिला मानसिक आधाराची गरज असते. अश्या वेळी आपण तिची काळजी घ्यायची, तिला काय हवं नको ते बघायचं. शक्य झाल्यास कधीतरी अधून मधून तिचे पाय,डोके चेपून द्यायचे. उन्हाळ्याच्या दिवसात थंड पेय करून द्यायचं. यामुळे जास्त काही फरक पडणार नाहीत पण या माध्यमातून तिच्याशी बोलायची , जवळीक साधण्याची संधी मिळेल. यामुळे आपल्याला काही अंशी समाधान तर तिला जगण्याची उमेद मिळते. कारण लहानपणा पासून ती कष्ट करत असते, सुरुवातीला आई-वडिलांच्या , नंतर पतीच्या, नंतर सासरच्या, नंतर आपल्या साठी झटत असते, आनंदी ठेवत असते. हे सर्व करतांना ती कधी रागावते , कधी झिडकारते, तर कधी चीडून आपल्याला मारते सुद्धा पण ते तीच एक प्रकारचं प्रेम असतं आपल्यावरच.

Comments

Popular Posts